क्रिकेटपटू रसिका शिंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 01:15 IST2021-11-25T01:14:54+5:302021-11-25T01:15:22+5:30
महाराष्ट्र मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल उदयोन्मुख क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.

क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करताना केरू पवार, दीपक जगताप, बी. एम. पवार आदी.
सिन्नर : महाराष्ट्र मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल उदयोन्मुख क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.
दहावीमध्ये शंभर टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येणारी, मराठा क्रांती मोर्चाची रणरागिनी, मविप्रच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळविणारी आणि आत्तापर्यंत शालेय राष्ट्रीय आणि रणजी स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल रसिका हिला गौरविण्यात आले.
यावेळी वडील प्रदीप शिंदे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचादेखील गौरव केला. देवनदी खोरे बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष केरू पवार, संचालक किरण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष दीपक जगताप, कचरू पाटील बोडके, भागवत पवार, शिवाजी पवार, युवराज डावरे, व्यवस्थापक निवृत्ती भागवत, रोखपाल मोरे, लिपिक सौरभ वरपे आदींसह सभासद उपस्थित होते.