कुटुंबाला मारहाण करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:00+5:302021-03-21T04:14:00+5:30
------------- मालेगावात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा मालेगाव : शहरातील गुलाब पार्क परिसरातून घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या शेख ...
-------------
मालेगावात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील गुलाब पार्क परिसरातून घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या शेख शाहिद शेख शफिक (रा. निहालनगर) याच्याविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद शाहिद मुराद आली यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी (क्रमांक एम. एच. ०९, डी. एफ. २३८६) लबाडीने चोरून नेली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उगले उगले करीत आहेत.
---------------------------
तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
मालेगाव : शहरातील एकता नगर भागात राहणाऱ्या प्रीती प्रकाश तायडे (१९) या तरुणीने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तिच्या भावाने कॅम्प पोलीस ठाण्यात दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
-------------------
चंदनपुरी शिवारात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
मालेगाव : शहरालगतच्या चंदनपुरी शिवारातील जुना गिरणा पुलाजवळ अत्यवस्थ स्थितीत आढळून आलेल्या अब्दुल खलील महंमद गफारखान (६०) या वृद्धाचा मृत्यू झाला. अत्यवस्थ स्थितीत त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राेहिले करीत आहेत.