अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर गुन्हा

By admin | Published: September 30, 2016 11:23 PM2016-09-30T23:23:24+5:302016-09-30T23:23:50+5:30

भातोडा वनविभाग : न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई

Crime against eight encroachment accused | अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर गुन्हा

अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर गुन्हा

Next

वणी : भातोडा येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाया जागेवर अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर वनविभागाने गुन्हा दाखल केले आहे.
सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी मात्र दिंडोरी तालुक्यात समावेश असणाऱ्या भातोडा गावातगत ५०० हेक्टर वनक्षेत्र असून, स्थानिक वन व्यवस्थापन समिती, वनविभाग व निसर्गप्रेमी ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे सदरच्या वनक्षेत्रावर विविध वनौषधी, विविध प्रकारचे वृक्ष यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. याची दखल शासकीय पातळीवर घेतली गेल्याने मंत्रालयातील अधिकारी राज्यपालांचे सचिव व वनविभागाच्या वरिष्ट अधिकारी यांनी दखल घेत ५० हेक्टर क्षेत्र बांबंूच्या व  उत्पादक बाबीसाठी प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी कागदोपत्री उपलब्ध करून दिले तसेच उपलब्ध आर्थिक उत्पन्नातून ग्रामविकासासाठी हा निधी वापराबाबत सुचित केले. दरम्यान त्या आदेशाचे व सूचनांचे पालन होत असताना सोकावलेल्या काही असामाजिक अपप्रवृतींनी वनसंपतीला क्षती पोहोचवत वनक्षेत्र अतिक्रमित करण्याच्या तक्रारी वनविभाला आल्यानंतर अधिकारी वाडेकर व पथकाने भेट देऊन पाहणी करून पंचनाम्याच्या कारवाईनंतर एकूण संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
अतिक्र मण गुन्ह्यात अतिक्र मण करणे हा गंभीर गुन्हा असून, अतिक्र मण-धारकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे व प्रवृत्त करणे अशा घटकांवरही कडक कारवाईची तरतूद असल्याने वनविभागाचा त्या दिशेने तपास सुरू आहे तसेच या ८ संशयिताना न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वाडेकर यांनी दिली.

Web Title: Crime against eight encroachment accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.