मालेगावी दुकाने सुरू ठेवणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:14 AM2021-03-23T04:14:59+5:302021-03-23T04:14:59+5:30
मालेगाव : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी धडक कारवाई करत कोरोनाचे ...
मालेगाव : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी धडक कारवाई करत कोरोनाचे नियम मोडून शनिवारी आणि रविवारी जिल्हाधिकाऱ्यांचे बंदचे आदेश असतानाही दुकाने सुरू ठेवून मास्क न वापरता व्यवहार सुरू ठेवणाऱ्या चार दुकानदारांविरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. यात किदवाई रोडवरील चप्पल विक्रेता फिरोज खान हसन खान, फजलू रहेमान (रा. हजारखोली), मोहमद वसीम जाहिद हुसेन, व्यवसाय व्यापार (रा. विजय नगर), जावेद अहमद अब्दुल रजाक (३५, रा. चमन नगर गुरुवार वॉर्ड) यांच्याविरोधात पोलीस कर्मचारी विलास सूर्यवंशी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. शहरातील पूर्व भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याची तक्रार होती. रात्री उशिरापर्यंत शहरात मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधातही कारवाई सुरू होती.