संशयावरून छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:46 PM2019-08-20T22:46:52+5:302019-08-21T01:03:48+5:30

पंडित कॉलनीमध्ये राहणाºया एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नीने संशयित पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

A crime against a husband who is harassed by a suspect | संशयावरून छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

संशयावरून छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

Next

नाशिक : पंडित कॉलनीमध्ये राहणाºया एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नीने संशयित पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पती परीक्षित सुरेश चौघुले (२९, रा.गंगापूररोड) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. पीडितेच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पीडित विवाहिता गर्भवती असताना तिच्या जेवणात थंड गोळी देऊन रात्रभर बसवून ठेवत मानसिक छळ केल्याचेही फिर्यादित म्हटले आहे. पीडित महिलेने किरकोळ गोष्टींसाठी खर्चाला पैसे पुरवावे या कारणावरून संशयित चौघुले याने छळ केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. चौघुले याने पीडितेच्या गळ्यावर चाकू ठेवून जिवे ठार मारण्याची तसेच मुलाला इमारतीच्या मजल्यावरून खाली फेकून देण्याची धमकीही दिल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सोन्याची साखळी, अंगठी, अल्टो कार अशा वस्तू बळजबरीने घेऊन अपहार केल्याचाही आरोप तिने पतीवर केला आहे. २०११ पासून पतीकडून छळ सुरू होता, असे फिर्यादित म्हटले आहे. अखेर त्याच्या छळाला कंटाळून तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.
कार खरेदीच्या बहाण्याने
दोन लाखांना गंडा
नाशिक : कार खरेदी करून कॉल सेंटरमध्ये भाडेतत्त्वावर लावून देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक करणाºया दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय उत्तम फुलमाळी (रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आकाश पाटील, संजय पाडे या दोघांनी फुलमाळी यांना निसान कंपनीची कार खरेदी करून देतो. कार कॉल सेंटरला भाडेतत्त्वावर देऊन त्या मोबदल्यात महिन्याला २४ हजार रु पये देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार, फुलमाळी यांच्याकडून संशयितांनी १ लाख ९० हजार रु पये उकळले. कार खरेदी झाली नाही आणि संशयितांनी फुलमाळी यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
साईनाथनगरला घरफोडी
नाशिक : मुंबईनाका परिसरातील साईनाथनगरला चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. १६ ते १८ आॅगस्ट दरम्यान वसीम बाबू खान (५१) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याने खान यांच्या घराचे लॉक तोडून घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २१हजार रु पयांची रोकड असा एकूण ३६हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A crime against a husband who is harassed by a suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.