अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:46+5:302020-12-25T04:12:46+5:30
----- विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा मालेगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व ...
-----
विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा
मालेगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सुनील अंबादास मोरे, रा. सावकारवाडी याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनीषा सुनील मोरे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ, दमदाटी, मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.
-----
आयोध्यानगर भागातून दुचाकी लंपास
मालेगाव : येथील आयोध्यानगर भागातून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ बीए ७१२४) चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी सागर पंढरीनाथ यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
-----
फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : बजाज हाउसिंग फायनान्स कंपनीचे कर्ज असताना मिळकतीचे परस्पर खरेदी खत तयार करून ९ लाख ९० हजार ७७२ रुपयांची रक्कम बुडविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याप्रकरणी श्रीमती ज्योती विजय वडनेरे या महिलेविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ऋषिकेश बळवंतराव देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. भायगाव शिवारातील मिळकत कंपनीकडे गहाण असताना येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकत विक्री केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.
-----
कोरोना खर्चावरून राजकारण तापले
मालेगाव : कोरोनाकाळातील खर्चावरून नगरसेवक आक्रमक झाले आहेत. सभागृह नेते अस्लम अन्सारी यांनी हज कमिटी कार्यालयात सर्व सुविधा असताना सहारा रुग्णालयावर खर्च का केला, असा सवाल उपस्थित केला आहे. माजी महापौर रशीद शेख यांच्यासह सत्तारूढ व विरोधी गटाच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. या विषयावरून शहरातील राजकारण तापू लागले आहे.
-----
संचारबंदीची अंमलबजावणी
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. या निर्णयाची मालेगाव शहर पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी किदवाई रोड परिसरात गस्त घालून दुकाने बंद केली होती. दररोज गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे.