न्यायालय आवारातील आगप्रकरणी वकिलाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:18+5:302021-04-04T04:15:18+5:30
------ नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी आगीचा भडका उडालेला दिसून आला होता. या घटनेप्रकरणी एका वकिलाविरुद्ध ...
------
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी आगीचा भडका उडालेला दिसून आला होता. या घटनेप्रकरणी एका वकिलाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र शिवाजीराव पवार (५५, रा.उपनगर) हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस मुख्यालयाच्या कंपाऊंडला लागून भिंतीजवळ शासकीय रेकॉर्ड नियमितपणे जाळत होते. पवार यांच्या फिर्यादीवरून यावेळी तेथे नेहे नामक वकील आले आणि त्यांनी ‘वकिलांच्या वाहनांना जागा नाही...’ अशी कुरापत काढून परिसरातील वाळलेल्या गवतावर जळते कागदपत्रे, फाईली फेकून देत आग लावून शासकीय परिसराला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून नेहे नामक वकिलाविरुद्ध भादंवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी अचानकपणे लागलेल्या आगीने न्यायालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली होती. सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून पेटलेले गवत विझविण्यात आले होते.