विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:47 AM2019-06-21T01:47:18+5:302019-06-21T01:48:30+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रिक्षाने प्रवास करीत असताना आरोपी रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (२२) याने महिलेचा हात धरून विनयभंग केला. महिलेने त्याला रिक्षा थांबविण्याची विनंती केली. मात्र गोफणे याने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे पीडितेने अखेर चालू रिक्षातून डाव्या बाजूला उडी मारली. त्यामुळे पीडितेच्या चेहºयाला व उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकारानंतर पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात
फि र्याद दिली. त्यावरून गोफणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.