शिवीगाळ प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा
By admin | Published: June 3, 2016 12:11 AM2016-06-03T00:11:37+5:302016-06-03T00:17:00+5:30
शिवीगाळ प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा
नांदगाव : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब शिंदे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (दि. १) रात्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेवरून गुरुवारी रात्री तणाव निर्माण झाला होता.
यावेळी संतप्त जमावाकडून एका बसची व अन्य दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांकडून संशयितास अटक झाल्याची खात्री झाल्यांनतर जमाव पांगला. पोलिसांनी घटनेची व जमावाची आक्रमकता बघता दंगा नियंत्रण कुमक बोलवली होती. रवि शिंदे यांच्या दुकानात किराणा माल घेण्यासाठी गेलेल्या राहुल जगताप यास किराणा दुकानदार राजेंद्र शिंदे यांनी जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या राहुल जगताप व त्याच्या सहकाऱ्यांना येथून निघून जा नाहीतर मी माझे कुटुंबाचे बरे वाईट करून घेईल असे म्हणून शिवीगाळ केली तसेच इतर जणांसमोर अपमानित केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जगताप यांच्या फिर्यादीत नमूद केले आहे. रास्ता रोकोप्रसंगी बस व अन्य दोन वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी बसचालक अरुण सुकदेव वाघ यांनी १२५ ते १५० अज्ञात पुरुषाविरोधात बसच्या काचा फोडल्या म्हणून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे, तर प्रदीप कासलीवाल यांनी त्यांच्या स्विफ्ट गाडीचे केलेल्या नुकसान प्रकरणी नाना जगताप, कुणाल मोरे, गौतम आहिरे, राहुल जगताप, संदीप पवार, रवि काकळीज, तानसेन जगताप, सुनील पवार, अरुण साळवे, नाना पवार आदिंविरोधात गाडीच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.