धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:35 AM2018-06-06T00:35:22+5:302018-06-06T00:35:22+5:30

इगतपुरी : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डन रिसॉर्टच्या मालकाला धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी मुंबईतील वरळी येथील पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलासह मावस भावाविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against police sub-inspector for threatening | धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्दे गोल्डन रिसॉर्ट या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते.मी मागेल तेवढे पैसे दे नाही तर तुझा इनकांउटर करेल, अशी धमकी

इगतपुरी : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डन रिसॉर्टच्या मालकाला धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी मुंबईतील वरळी येथील पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलासह मावस भावाविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी, मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक मांजरेकर, त्यांचा मुलगा सुबोध मांजरेकर, मावस भाऊ, चालक गणेश हे मार्च महिन्यात इगतपुरी येथील बोरटेंभे शिवारात असलेल्या गोल्डन रिसॉर्ट या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेल मालक सुरजितसिंग नारंग हॉटेल मध्ये उपस्थित होते. त्यांचे मुंबईतही गोल्डन पॅलेस या नावाने एक हॉटेल आहे. या अनुशंगाने पोलीस उप निरीक्षक माजंरेकर यांनी मुंबई कडील ओळख काढुन नारंग यांचा विश्वास संपादन केला. आपला मुलगा सुबोध याला हॉटेल व्यावसायात करीअर करायचे आहे त्याला अनुभव मिळण्यासाठी गोल्डन रिसॉर्टमध्ये त्याला व माझ्या मावसभावाला दोन महीने काम शिकवा अशी विनंती त्यांनी केली. मालक सुरजितसिंगही त्यास तयार झाले. त्यानंतर दि. २५ मार्च रोजी सुबोध मांजरेकर, चालक गणेश, मावसभाऊ यांनी हॉटेल गोल्डन रेसॉर्टचे व्यावस्थापक राजु सिंग यांची भेट घेउन मालकांनी आम्हाला येथे काम शिकण्यासाठी पाठवले असल्याचे सांगीतले. व्यवस्थापक राजु यांनी मालक सुरजितिसंग यांना फोन केला असता त्यांनी उभयतांच्या जेवणाची व राहाण्याची सोय करून देण्यास सांगीतले.त्याचबरोबर मी आल्यावर त्यांना काम करण्या बाबत माहिती देईन असे सांगितले . यानंतर दि. ३१ मे पर्यंत हे तिघे गोल्डन रीसॉर्टमध्ये राहत होते. या दोन महीन्यात त्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही हॉटेल चालविण्यासाठी घेतले असल्याचे सांगितले. व्यवस्थापक राजु यांनी हा प्रकार मालकाच्या कानावर घातला. त्यानंतर मालक सुरजितसिंग यांनी पोलीस उपनिरीक्षक मांजरेकर यांना फोन करु न कुर्ला मुंबई येथे असलेल्या गोल्डन पॅलेस हॉटेल येथे बोलवले, व रिसॉर्ट चालवायला घेतले असा प्रचार अपण का करता अशी विचारणा केली. तेव्हा मांजरेकर यांनी मी इनकांउटर स्पेशल आहे, माझ्या मुलाला हॉटेल बाहेर काढायचे नाही. जर गोल्डन रिसॉर्ट पाहिजे असेल तर मी मागेल तेवढे पैसे दे नाही तर तुझा इनकांउटर करेल, अशी धमकीच सुरजितसिंग यांना दिली. या घटनेमुळे भयभित झालेल्या सुरजितसिंग सारंग यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक मांजरेकर व मुलगा सुबोध, मावस भाऊ, चालक गणेश यांच्या विरोधात तक्र ार दाखल केली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against police sub-inspector for threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा