तीन घरमालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 01:22 AM2020-12-06T01:22:39+5:302020-12-06T01:23:36+5:30

भाडेकरूची माहिती दडवल्याप्रकरणी एकाच इमारतीतील तीन घरमालकांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश खर्चे (रा. ठाणे), रमेश इंगळे व सचिन शहा (रा. विद्याविकास सर्कल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित घरमालकांची नावे आहेत.

Crime against three homeowners | तीन घरमालकांवर गुन्हा

तीन घरमालकांवर गुन्हा

Next

नाशिक : भाडेकरूची माहिती दडवल्याप्रकरणी एकाच इमारतीतील तीन घरमालकांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश खर्चे (रा. ठाणे), रमेश इंगळे व सचिन शहा (रा. विद्याविकास सर्कल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित घरमालकांची नावे आहेत.

संशयितांच्या आर्चित विहार या सोसायटीत सदनिका असून, त्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. शहरात परजिल्हा आणि परप्रांतीय गुन्हेगारांचे वास्तव्य चर्चेत आल्यानंतर शहर पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यात भाडेकरूंची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार संशयितांनी आपल्या भाडेकरूंची माहिती लपविली. सरकारवाडा पोलिसांनी याची खातरजमा केली असता ही बाब उघडकीस आली. संशयितांच्या घरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून भाडेकरू राहत असताना माहिती दडविण्यात आल्याने एकाच इमारतीत सदनिका असणाऱ्या तीन घरमालकांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against three homeowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.