भ्रमणध्वनी चोरून नेणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:17+5:302021-04-18T04:13:17+5:30
-------------------- तरुणाला मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : तालुक्यातील जळगाव येथे नळांना पाणी का सोडले? अशी कुरापत काढून ...
--------------------
तरुणाला मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील जळगाव येथे नळांना पाणी का सोडले? अशी कुरापत काढून एका तरुणाला आट्यापाट्या व लोखंडी गजाने मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पांडुरंग घमा कुटे यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश केदारे, तात्या प्रकाश केदारे, भुरा प्रकाश केदारे, शरद भगवान गायकवाड, भूषण सुभाष संसारे, संतोष भुरा गायकवाड, भीमा भगवान गायकवाड, राजेंद्र जिभाऊ केदारे (सर्व राहणार जळगाव (गा) यांनी गावातील नळांना पाणी का सोडले? अशी कुरापत काढून फिर्यादीचा मुलगा विकी याला मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेले शिवराम कुटे यांनाही दमदाटी, शिवीगाळी करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार राऊत करीत आहेत.
---------------------
तलवारीने मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील पेरी चौकात सोडागाडी चालकाशी मागील भांडणाची कुरापत काढून तलवारीने व कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्या तसेच गाडीची तोडफोड करून नुकसान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख सिराज अहमद फकीर मोहम्मद यांनी फिर्याद दिली आहे. शेख शोएब अब्दुल रशीद, शेख फरीद अब्दुल रशीद, बिल्ला, मजरदादा (पूर्ण नाव माहीत नाही), अब्दुल रशीद एकलाख अब्दुल रशीद यांनी मागील भांडणाची कुरापत काढून तलवार व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवलदार एमटी गायकर करीत आहेत.
------------------
कारच्या धडकेत तरुण जखमी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात पायी जाणाऱ्या जाविद शेख अब्दुल रज्जाक याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख एजाज अब्दुल रज्जाक यांनी फिर्याद दिली आहे. सर्वेश सतीश लोहार हा कारने धुळ्याकडून नाशिककडे जात असताना जाविदला धडक दिली. पुढील तपास हवालदार फुलमाळी करीत आहेत.
चंद्रमनी नगरात कोरोना रिपोर्टवरून मारहाण
मालेगाव : शहरालगतच्या द्याने येथील चंद्रमणी नगरात एका तरुणाच्या बहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नसल्याचा राग येऊन दीपक(पूर्ण नाव माहीत नाही) याने फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने रमजानपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या बहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, याची माहिती दीपकला दिली नसल्याने त्याचा राग येऊन दीपकने लोखंडी रॉडने दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
----------------
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या राहुल सोमनाथ अहिरे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला काही तरी आमिष दाखवून अहिरे याने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.