रुग्णवाहिका चालकास मारहाण प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:08 AM2018-09-19T01:08:51+5:302018-09-19T01:09:15+5:30
वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी : वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर मारहाण प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार मंगळवारी (दि. १७) सायंकाळी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. तत्पूर्वीच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलनास स्थगिती देण्यात आली. मात्र आंदोलकांनी एकत्र येत ठिय्या देत सदर महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत अटक कररण्याची मागणी केली.
संबंधित महिलांवर कडक कारवाई करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यात आंदोलक जमा झाले होते. यासाठी आदिवासी बचाव समिती, अदिवासी संघर्ष समिती, प्रहार संघटना व भारिप बहुजन महासंघ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच आमदार नरहरी झिरवाळ हे या ठिकाणी आले होते. नियोजित आंदोलन असल्याने पोलीस कुमक मागवली होती.
सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वणी पोलीस ठाण्यास छावणीचे स्वरूप् आले होते. संबधीत महिलांना अटक झालीच पाहीजे यासाठी पुन्हा वणी पोलीस ठाण्यात घरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी आमदार नरहरी झिरवळ यांनी पोलीसांच्या कारभराबाबत कानपीचक्या देत चांगलाच समाचार घेतला . या ठिकाणी तपास प्रमुख सदाशिव वाघमारे ,यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगुर्डे, सुरगाणा शिवसेनेचे मोहन गांगुर्डे, आदिवसाी संघर्ष समितीचे विजय घोटे गणेश पवार सुरगाणा, महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानाचे संदीप जगताप , अमोल गावित , काशीनाथ भोये , चेतन राउत,केशव भोये , श्यामराव ढुमसे , दशरथ महाले, विजय गोतरणे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
: