महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:00 IST2018-09-04T17:59:16+5:302018-09-04T18:00:09+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मानोरी येथील संशयिताविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मानोरी येथील संशयिताविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानोरी येथील संशयित रामदास खंडू सानप यांच्याकडून सदर विवाहितेच्या पतीने पैसे घेतले होते. रामदास सानप यांच्याकडून घेतलेले पैसे परत केल्यानंतरही त्याच्याकडून अजून पैशांची मागणी केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर पैसे घेण्यासाठी घरी पती नसतांना संशयित सानप सदर विवाहितेच्या घरी गेला. यावेळी संशयिताने विनयभंग केल्याची तक्रार महिलेने वावी पोलीस ठाण्यात केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.