सिडको परिसरात गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:53 AM2019-06-25T00:53:44+5:302019-06-25T00:54:01+5:30
परिसरात दरोडा, चेनस्नॅचिंग, दुचाकी वाहने जाळणे, छेडछाड या प्रकारच्या गुन्हेगारीत वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, या मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या वतीने देण्यात आले.
सिडको : परिसरात दरोडा, चेनस्नॅचिंग, दुचाकी वाहने जाळणे, छेडछाड या प्रकारच्या गुन्हेगारीत वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, या मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या वतीने देण्यात आले.
भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या सिडको विभाग अध्यक्षा नगरसेवक छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, शहराध्यक्षा रोहिणी नायडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अंबड पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, सिडको भागात गुन्हेगारीत वाढ होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी मनीषा देवरे, जयश्री वाटी, वर्षा महाजन, ललिता भावसार, शुभांगी देशमाने, विमल पोरजे, हर्षदा पाटील, कविता सोनार आदींसह भाजपा महिला मोर्चा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्स्तची मागणी
दिवसाढवळ्या उंटवाडी भागात मुथूट फायनान्स कार्यालयावर दरोडा टाकून गोळीबार केला. परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून दुचाकी जाळणे, उत्तमनगर भागात महाविद्यालय असल्यामुळे टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. महाविद्यालयीन मुलींची छेडछाड काढली जाते. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.