सिलिंडरमधील गॅसचोरी प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:27 AM2018-01-28T01:27:14+5:302018-01-28T01:27:51+5:30
ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यापूर्वी त्यातील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये काढणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़२६) अटक केली़ सचिन सुनील गवळी (२१, रा़ गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
नाशिक : ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यापूर्वी त्यातील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये काढणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़२६) अटक केली़ सचिन सुनील गवळी (२१, रा़ गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस शिपाई रावजी मगर यांना याबाबत माहिती मिळाली होती़ त्यानुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास हिरावाडीतील दामोदर गार्डनजवळ पाळत ठेवली होती़ संशयित सचिन गवळी याने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यास सुरुवात करताच त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून टेम्पो (एमएच १५, एजी ९९८०), चार भरलेले सिलिंडर, सहा तुटलेले सील, एक रिकामे सिलिंडर वजन काटा, सात इंचाचे गॅस ट्रान्सफ र निपल असा आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, नागेश मोहिते, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, पोपट कारवाळ, हवालदार अनिल दिघोळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली़