आडगाव हद्दीत गुन्हेगारीत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:26 AM2018-09-25T00:26:11+5:302018-09-25T00:26:36+5:30
येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पंचवटी : येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाशिक शहरातील शांत पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार तसेच चोरट्यांनी डोके वर काढल्याने कारवाई कोण करणार असा सवाल नागरिकांनी केला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या आडगाव शिवारातील कोणार्कनगर, औरंगाबादरोड, अमृतधाम, आडगाव या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोºया तसेच घरफोड्याच्या घटना वाढीस आलेल्या आहेत. किरकोळ कारणावरून हाणामारी, मारामारीचे गंभीर प्रकार परिसरात घडत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पुजारी यांची बदली होऊन त्यांच्या जागी सुरज बिजली यांची पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परिसरात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात असली तरी आडगाव पोलिसांची दैनंदिन गस्त होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.