म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा; २ हजाराची लाच घेताना हवालदार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 07:14 PM2020-07-21T19:14:13+5:302020-07-21T19:29:16+5:30
नाशिक : अदलखपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यााठी २ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एका ...
नाशिक : अदलखपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यााठी २ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एका हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. सुधीर विश्राम पवार असे संशयित लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
लाचेची मागणी होत असल्याची तक्रार देणाऱ्या तक्र ारदाराविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी हवालदार पवार याने तक्रारदाराकडे २ हजार रूपयांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम इतरत्र कोठे नाही तर थेट कर्तव्यावर असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आवारातच स्विकारायचे ठरले. याबाबत तक्र ारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खात्री करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) पोलीस ठाण्याच्या आवारात दुपारी सापळा रचला. तक्रारदाराकडून ठरल्याप्रमाणे दोन हजार रूपये स्विकारताना पवार यास पथकातील कर्मचाऱ्यांनी तेथेच ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. जेथे कर्तव्य बजावत होते त्याच पोलीस ठाण्यात लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याती दुर्दैवी वेळ पथकावर आली. शासकीय तसेच निमशासकीय कापर्यालयात कोणी अधिकारी, कर्मचारी अथवा खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास निसंकोपणे नागरीकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.