क्राईम न्युज - ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:24+5:302020-12-14T04:30:24+5:30

------ सामान्य रुग्णालयाजवळून दुचाकीची चोरी मालेगाव : शहरातील सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली २५ हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स दुचाकी ...

Crime News - 4 | क्राईम न्युज - ४

क्राईम न्युज - ४

Next

------

सामान्य रुग्णालयाजवळून दुचाकीची चोरी

मालेगाव : शहरातील सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली २५ हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स दुचाकी क्रमांक एमएच ४१ एजे ०२६४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शफीक खान शब्बीर खान (३०) रा. अहमदपुरा, रमजानपुरा यांनी फिर्याद दिली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक हिरे करीत आहेत.

-------

महिलेची दीड लाखांची सोन्याची पोत चोरी

मालेगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना बसस्थानकदरम्यान गेल्या बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख ६३ हजार ८९१ रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. सुमन तुळशीदास त्रिभुवन (५२) रा. मनोरमा अपार्टमेंट, आदर्श कॉलनी, औरंगाबाद यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. सुमन त्रिभुवन ही महिला औरंगाबाद येथे जाण्यासाठी सकाळी जुना बसस्थानकातून मालेगाव-जालना बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यात अडकविलेल्या पर्सची चैन खोलून ५२.४५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चाेरून नेली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

-------

निमगाव येथे हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे विहिरीवरून पाणी भरण्याच्या वादातून हाणामारी झाली असून, याप्रकरणी अरुण उत्तम खैरनार व त्याचा साथीदार रा. निमगाव यांच्या विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यमुनाबाई सुभाष खैरनार (५०) रा. मथुरपाडे रोड, निमगाव यांनी फिर्याद दिली. काल शनिवारी विहिरीवरून पाणी का भरू देत नाही, असे यमुनाबाईने म्हटल्याचा राग आल्याने आरोपींनी काठीने व हाताने मारहाण केली. फिर्यादीचा मुलगा सूरज यास मारहाण करून जीवे ठार मारण्याचा दम दिला. अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.

--------

Web Title: Crime News - 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.