धक्कादायक! कर्जाचे आमिष दाखवून अभियंत्याला तब्बल ४६ लाखांचा गंडा; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:22 AM2022-03-21T11:22:25+5:302022-03-21T11:25:18+5:30

मालेगाव येथील टेलिकॉम अभियंता व ठेकेदार अंबादास रघुनाथ चौधरी यांना व्यवसायासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, ...

Crime News By showing the lure of loan, he cheated the engineer to the tune of Rs 46 lakh in malegaon | धक्कादायक! कर्जाचे आमिष दाखवून अभियंत्याला तब्बल ४६ लाखांचा गंडा; झालं असं काही...

धक्कादायक! कर्जाचे आमिष दाखवून अभियंत्याला तब्बल ४६ लाखांचा गंडा; झालं असं काही...

Next

मालेगाव येथील टेलिकॉम अभियंता व ठेकेदार अंबादास रघुनाथ चौधरी यांना व्यवसायासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आरोपी कमलेश टिकमदास तेजवाणी याने आमिष दाखविले. भूलथापा देऊन कर्ज प्रकरणासाठी प्रोसेस फी म्हणून ४६ लाख रुपये फिर्यादीकडून बँक खात्यामार्फत मिळवून रक्कम हडप केली. मात्र कर्ज मंजूर करून दिले नाही. उलट आरोपीने वेळोवेळी राहत्या घराचा व कार्यालयाचा पत्ता बदलला.

आरोपीने खोटे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. अपर पोलीस अधीक्षक आणि छावणी पोलिसातही लेखी तक्रार दिली होती. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. एम. तांबे यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. त्यानुसार छावणी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे ॲड. सुधीर अक्कर यांनी कळविले आहे.

Web Title: Crime News By showing the lure of loan, he cheated the engineer to the tune of Rs 46 lakh in malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.