नात्याला काळीमा! विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:34 PM2021-12-24T12:34:18+5:302021-12-24T12:39:59+5:30

नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली ...

Crime News youth raped her mother in law | नात्याला काळीमा! विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर केला बलात्कार

नात्याला काळीमा! विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर केला बलात्कार

Next

नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या सप्टेंबर महिन्यात पीडित महिलेच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीला महिला मूळ रिसोड तालुक्यातून नाशिकमध्ये आली होती. यावेळी संशयित नितीन आशू वाणी (३५, रा. भारतनगर, मूळ वाशिम) याने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून घेत साडीचोळी करण्याचा बनाव केला.

पीडित महिला रात्री मुक्कामी थांबली असता मध्यरात्रीच्या सुमारास संशयित नितीन याने नात्याने मावस सासू लागणाऱ्या पीडितेचा झोपेत गळा दाबला आणि त्यांना विषाची बाटली दाखवून दमदाटी करत बलात्कार केल्याचे फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पीडितेला तिची अश्लील छायाचित्रे मोबाइलवर दाखवून धमकावत एका हॉटेलमध्ये येण्यास भाग पाडले आणि तेथेही संशयिताने पुन्हा अत्याचार केला. यानंतर १० नोव्हेंबर रोजी संशयित नितीन याने अमरावती गाठून तेथे पीडितेच्या राहत्या घरी जाऊन पुन्हा शारीरिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे. यानंतर पीडित महिलेने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून प्रथम घटना नाशिकमधील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणी संशयित नितीन हा अद्याप फरार असून पुढील तपास मुंबईनाका पोलिसांकडून केला जात आहे.

 

Web Title: Crime News youth raped her mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.