दिंडोरीत सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 00:44 IST2021-06-09T22:12:04+5:302021-06-10T00:44:59+5:30

वणी : मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून संशयितांनी शिवीगाळ करीत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने सहा जणांविरोधात दिंडोरी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime of riot against six persons in Dindori | दिंडोरीत सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

दिंडोरीत सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

ठळक मुद्देदिंडोरी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वणी : मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून संशयितांनी शिवीगाळ करीत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने सहा जणांविरोधात दिंडोरी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, केशव जिवला उघडे (४३) हे करंजवण डॅम येथील सुला वाईन्स कंपनीच्या पाईपलाईनजवळ इलेक्ट्रिक मोटार चालू-बंद करण्यासाठी थांबले होते. त्यादरम्यान सागर काशीनाथ पवार व इतर पाच अनोळखी व्यक्ती या ठिकाणी आल्या व जुन्या वादाची कुरापत काढून वाद घालू लागले व उघडे यांच्या मित्रास पकडून शिवीगाळ, दमदाटी करीत काठीने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी सदर सहा संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime of riot against six persons in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.