सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:37 AM2019-02-27T00:37:21+5:302019-02-27T00:37:45+5:30
शहराच्या मध्यवर्ती परिसराची हद्द असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यापुढे राहणार आहे.
नाशिक : शहराच्या मध्यवर्ती परिसराची हद्द असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यापुढे राहणार आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून लूटमार, वाहनचोरीसह देहविक्रयसारखे अवैध व्यवसाय तेजीत आले आहेत.
सरकारवाडा पोलीस ठाणे गंगापूररोडवरील आयुक्तालयाशेजारी आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहराच्या बाजारपेठेसह मध्यवर्ती भाग येतो. जिल्हा न्यायालयापासून जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत महत्त्वाचे सरकारी कार्यालये, अस्थापना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत कायदासुव्यवस्था चोखपणे ठेवण्याचे आव्हान बोरसे यांच्यापुढे असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलीस ठाण्यामधील ठाणे अंमलदार कक्षापासून थेट गुन्हे शोध पथकापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी लागणार असून, आलेली मरगळ झटकावी लागणार आहे. तक्रारदारांसह सर्वसामान्यांना योग्य ती माहितीदेखील संबंधितांकडून पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधून दिली जात नसेल तर परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांसंबंधी कितपत गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठांपर्यंत माहिती पोहचविली जात असेल? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
उद्धटपणे नागरिकांशी संवाद
सरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया हद्दीमधील नागरिक संमिश्र असून, कोणी डॉक्टर, वकील, व्यावसायिक, शिक्षक-प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक या वर्गातील आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे नागरिक आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या आशेपोटी सरकारवाडा पोलीस ठाण्याची पायरी चढतात, त्यांच्या तक्रारींचा निपटारा तर दूरच मात्र उद्धटपणाचा संवाद पदरी पडतो, असे गाºहाणे नागरिकांनी मांडले आहे. यामुळे आगामी काळात नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यामधील वागणूक सुधारण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत.