शहरातील ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे; अटी-शर्थींचा सर्रास भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 08:38 PM2020-05-05T20:38:42+5:302020-05-05T20:47:11+5:30

जिल्हा प्रशासनाकडून शासन आदेशानुसार विवीध अटीशर्थीच्या अधिन राहून सोमवारी (दि.४) दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत मद्यविक्र ीची दुकाने उघडण्याची परवानगी शहरात देण्यात आली होती.

Crimes against 57 liquor dealers in the city; Violation of terms and conditions | शहरातील ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे; अटी-शर्थींचा सर्रास भंग

शहरातील ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे; अटी-शर्थींचा सर्रास भंग

Next
ठळक मुद्देकाही ठिकाणी सौम्य लाठीमारही केलासर्वाधिक गुन्हे गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत

नाशिक : पाचपेक्षा अधिक ग्राहकांची गर्दी होता कामा नये, परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ प्रस्थापित करणे आवश्यक, थर्मल स्कॅनिंगचे नियम पाळावे, अशा विविध अटीशर्थींचे पालन करणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने विक्रीच्या आदेशात म्हटले होते; मात्र मद्यपींची मद्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्यामुळे सर्वच अटी-शर्थी, नियमांचा भंग झाला. यामुळे पोलिसांनी दुकाने बंद पाडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान सोमवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी पुढील आदेशापर्यंत शहर व परिसरातील मद्यविक्र ीची सर्व दुकाने कुलूपबंद राहतील असे आदेश काढले.

जिल्हा प्रशासनाकडून शासन आदेशानुसार विवीध अटीशर्थीच्या अधिन राहून सोमवारी (दि.४) दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत मद्यविक्र ीची दुकाने उघडण्याची परवानगी शहरात देण्यात आली होती. कुठल्याही प्रकारे अटी शर्थीचे पालन न करता सर्रासपणे मद्यविक्र ी केल्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तात्काळ अशा मद्यविक्र ेत्यांविरु द्ध गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सोडले. शहर पोलिसांनी ज्या दुकानांवर झुंबड उडाल्याचे दिसून आले ती मद्यविक्र ीच्या दुकानांचे शटर बंद करण्यास सांगितले.
शासनाच्या आदेशानुसार राज्यभरातील मद्यविक्र ीस सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलीस, राज्य उत्पादन शु्ल्क विभागाने बैठक घेत कोणती खबरदारी घ्यायची याबद्दल नियोजन केले होते. तसेच मद्यविक्र ेत्यांना पुर्वकल्पना देत दोन ग्राहकांमध्ये किमान ६ फुट अंतर, दुकानात येणा-या कर्मचारी, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंगमार्फत तपासणी बंधनकारक केली, ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असतील त्यांना दुकानात येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र मद्य खरेदी करणार्यांनी किंवा विक्र ेत्यांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने शहर पोलिसांनी सुरु वातीस ग्राहकांना समजावून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच काही ठिकाणी सौम्य लाठीमारही केला. तरीदेखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने सायंकाळी चारनंतर सर्व मद्यविक्र ीचे दुकाने बंद करण्यास सांगितले. तसेच नियमांचे पालन न करणार्या ५७ मद्यविक्र ेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात सर्वाधिक गुन्हे गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले आहेत.

Web Title: Crimes against 57 liquor dealers in the city; Violation of terms and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.