खासदार भारती पवार, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत यांच्याविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 02:22 PM2021-06-29T14:22:08+5:302021-06-29T14:29:59+5:30

रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

Crimes against MP Bharti Pawar, Devyani Farande, Seema Hiray and Sadabhau Khot | खासदार भारती पवार, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत यांच्याविरुध्द गुन्हा

खासदार भारती पवार, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत यांच्याविरुध्द गुन्हा

Next
ठळक मुद्देआंदोलन भोवले नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी यांच्याविरुध्द गुन्हा

नाशिक : शहरात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू असताना तसेच कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केलेले असतानासुध्दा विनापरवानगी द्वारका चौका एकत्र येत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी यांच्यासह ८५ आंदोलकांविरुध्द मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व सदाभाऊ खोत, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, वाल्मिक सांगळे, गिरिश पालवे यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांनी एकत्र येत बैलजोडी आणून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला होता. याप्रकरणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन तसेच विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे मुंबईनाका पोलीस ठाण्यात कलम-१८८, २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मुस्लीम उत्कर्ष समितीकडून मुस्लीम समाजाला २० टक्के आरक्षण दिले जावे, याप्रमुख मागणीसाठी शेख हनीफ बशिर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका मेमन, तडवी आणि ५० महिला, पुरुष आंदोलकांनी द्वारका चौकात येऊन ठिय्या देत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम-३४१, २६९, २७०, १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक मुंढे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Crimes against MP Bharti Pawar, Devyani Farande, Seema Hiray and Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.