चांदवडला मास्क नसणाऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:37 PM2020-04-25T23:37:41+5:302020-04-25T23:37:56+5:30
विनामास्क फिरणाºया नागरिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने चांदवड नगर परिषदेच्या पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली.
चांदवड : शहरात विनामास्क फिरणाºया नागरिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने चांदवड नगर परिषदेच्या पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली. यावेळी स्वत: मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी विनामास्क घालणाºया नागरिकांना पाचशे रुपये दंड करून नगर परिषदेमार्फत मास्क देऊन त्यांना मास्क घालण्याचे व विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नगर परिषदेने भाजीपाला विक्रेत्यांवरही भाजीपाला विकताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे व स्थायी स्वरूपात भाजी विकताना गर्दी केल्यामुळे नगर परिषदेने संबंधित विक्र ेत्यांवर गुन्हा दाखल केला. सदर पथकामध्ये चांदवड नगर परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, स्थापत्य अभियंता अनिल कुरे, संजय क्षीरसागर, यशवंत बनकर, श्रावण कापसे, शरद धोतरे आदी उपस्थित होते. चांदवड नगर परिषद कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे ३ मे २०२० पर्यंत शहरातील सर्व दुकाने ही मेडिकल व दवाखाने सोडून दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहतील व इतर आस्थापना बंदच राहतील, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
आहेर यांच्या उपस्थितीत
रमजानसंदर्भात बैठक
चांदवड : येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत विश्रामगृहावर बैठक झाली. बैठकीत मदत नव्हे कर्तव्य या हेतूने तालुक्यातील गोरगरीब जनतेला आजपर्यंत किती अत्यावश्यक वस्तू तसेच भाजीपाला वाटप झाला याचा आढावा घेतला. तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना फेस शिल्ड उपलब्ध करून दिले असून, दोन ते तीन दिवसात सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचेल असे सांगितले. रमजान सणाविषयी नियोजन संदर्भात तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या समवेत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सदस्य डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, विजय धाकराव, योगेश ढोमसे, नगरसेवक जगन राऊत, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अशपाक खान, जावेद घासी, महेश खंदारे, कासिफ खान, मुकेश आहेर आदी उपस्थित होते.