ठाण्याच्या मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करणाऱ्यास नाशकात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 04:49 PM2020-01-16T16:49:30+5:302020-01-16T16:52:48+5:30
२० हजार रु पयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक : ठाण्यामधील कळवा पुर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारत जबरी लूट करणा-या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशियत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास वीर युवराज मेडीकल स्टोअर्सचे शटर उचकटवून चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र मेडिकलमध्ये प्रेमिसंग किशोरिसंग राजपुरोहित ( ४६ ) हे झोपलेले होते. शटरचा आवाज ऐकून प्रेमिसंग झोपेतून जागा झाला, त्यावेळी अन्सारी याने प्रेमिसंगवर गोळी झाडून त्याचा खून केला होता. तसेच गल्यातील ८ हजार ६५० रु पये घेऊन पोबारा केला होता. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करु न संशियताचा शोधासाठी तपासाला गती दिली. दरम्यान, गुन्हेगारांच्या आदान प्रदान कार्यक्र मात ठाणे पोलिसांनी संशियताचा फोटो नाशिक पोलिसांकडे पाठविल. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोधमोहिम राबविली. आपल्या गोपनीय नेटवर्कद्वारे त्याची चाचपणी सुरू केली. दरम्यान, आडगाव शिवाराजवळील निलगीरी बाग झोपडपट्टीत संशयित सरफराजसोबत काही महिला फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी खात्री करु न दोघी महिला ताब्यात घेतल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्या दोघीही केटरींगचे काम करतात अशी माहिती पुढे आली. सरफराज हा चोरी करत असून तो अधुनमधून नाशिकला आमच्याकडे येत असल्याची कबुली त्या महिलांनी दिली. या माहितीवरून पथकाने गुरु वारी (दि.१५) सरफराजला ताब्यात घेण्यासाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर व पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने निलगीरी बाग परिसरात सापळा रचला.
त्याच्याकडून २० हजार रुपयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रुपयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरूध्द बेकायदेशीर शस्त्रवापरल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याला लवकरच ठाणे पोलिसांकडे सोपविले जाणार आहे.