गुन्हेगार चोथवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:41 AM2018-12-25T00:41:15+5:302018-12-25T00:41:35+5:30

मखमलाबादरोड परिसरातील दाबेली विक्रेत्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा पंचवटीतील सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेसह चौघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Criminal Code | गुन्हेगार चोथवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

गुन्हेगार चोथवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

Next

पंचवटी : मखमलाबादरोड परिसरातील दाबेली विक्रेत्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा पंचवटीतील सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेसह चौघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृंदावन कॉलनीतील रहिवासी अजय गरुड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ५ डिसेंबर २०१८ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास ते क्रांतीनगरहून मधुबन कॉलनीकडे जात होते़ संशयित तुकाराम चोथवे याने त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करून दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ यावर माझ्याकडे पैसे नाही, मी पैसे देणार नाही असे गरुड याने सांगितले असता चोथवे याने पुन्हा शिवीगाळ व मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही, तू परिसरात दिसायचे नाही, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल असून अजून एक गुन्हा दाखल झाल्यास मला फरक पडणार नाही, अशी धमकी दिली.
या घटनेस तेरा दिवस उलटत नाही तोच १८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित तुकाराम चोथवे, विकी भास्कर, पप्पू शेवरे व सुमित काळे हे सहकाऱ्यांसह लक्ष्मीपार्क येथे आले़ या सर्वांनी शिवीगाळ करून पुन्हा खंडणीची मागणी करून तुक्या भाईला पैसे दिले नाही तर तुझा काटा काढू अशी धमकी दिली़ यानंतर तुकाराम चोथवे याने पिस्तूल रोखून तू दरवर्षी शिर्डीला पायी जातो, तुला मित्रांच्या मदतीने ठार मारील, अशी धमकी दिली़  सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे व त्याच्या साथीदारांकडून मिळणाºया वारंवार खंडणी व जिवे मारण्याची धमकीस घाबरलेल्या गरुड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे़

Web Title: Criminal Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.