कमांड अॅण्ड कंट्रोलच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना
By admin | Published: September 7, 2015 12:31 AM2015-09-07T00:31:13+5:302015-09-07T00:34:05+5:30
कमांड अॅण्ड कंट्रोलच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना
नाशिक : शालिमार परिसरातील नेपाळी कॉर्नरवर दोन गटांतील वादात एकाकडे धारदार शस्त्र असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद होताच पोलीस आयुक्तालयातील कमांड अॅण्ड कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ भद्रकाली पोलिसांना सूचित केल्याने पुढील अनर्थ टळला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़
नेपाळी कॉर्नर परिसरात रविवारी (दि.६) दुपारच्या सुमारास काही युवकांमध्ये वाद सुरू होते़ हे वाद पोलीस नियंत्रण कक्षातील सीसीटीव्हीमध्ये दिसल्याने या दोन्ही गटांवर पोलसांचे नियंत्रण होते़ या युवकांपासून जवळच उभ्या असलेल्या एका रिक्षातील संशियताकडे धारदार शस्त्र असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले़ त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षातून भद्रकाली पोलिसांना सूचित करण्यात आले़
या सूचनेनंतर भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हवालदार बाळू लभडे, नाईक पी. एन. मोजाड आदिंनी घटनास्थळी धाव घेतली असता संशयित फरार झाले़ मात्र, सीसीटीव्हीमार्फत त्यांचा शोध घेऊन त्यातील दोघांना वावरे लेनमधून, तर एकास ठाकरे गल्लीतून ताब्यात घेण्यात आले़
या तिघांकडे धारदार हत्यार मिळाले असून, त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)