ड्रेनेजमध्ये आढळलेला मृतदेह गुन्हेगाराचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:21 AM2019-04-22T01:21:06+5:302019-04-22T01:21:29+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळबाबानगरमधील भुयारी गटारीच्या ड्रेनेजमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली आहे.

 Criminal found in the drainage | ड्रेनेजमध्ये आढळलेला मृतदेह गुन्हेगाराचा

ड्रेनेजमध्ये आढळलेला मृतदेह गुन्हेगाराचा

Next

पंचवटी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळबाबानगरमधील भुयारी गटारीच्या ड्रेनेजमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली आहे. मृतदेह परिसरातील सराईत गुन्हेगार विकी उर्फ टेंबऱ्या भुजबळचा (२१) असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हेगारी गटातून विकीचा घात करण्यात आला की त्याचा अपघाताने ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
गेल्या मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिरावाडी गुंजाळबाबानगर परिसरात असलेल्या एका चेंबरजवळ कुत्री भुंकत असल्याने तेथे राहणाºया शरद गुंजाळ यांनी चेंबरकडे धाव घेतली असता त्या चेंबरमध्ये एक ३५ ते ४० वर्षे इसमाचा मृतदेह आढळून आल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर गुंजाळ यांनी याबाबत पंचवटी पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. बेवारस अवस्थेत आढळलेल्या मयताच्या हातावर विकी नाव गोंदलेले होते. चेंबरमध्ये पाण्यात मृतदेह पडून राहिल्याने मृतदेहाची ओळख पटविणे अवघड होते; मात्र हातावरील ‘विकी’ नावावरून अखेर पोलिसांनी मयताच्या माहिती घेण्यास सुरु वात केली असता सदरचा मृतदेह हा परिसरातील सराईत गुन्हेगार विकी भुजबळचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भुजबळ याच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याचा मृतदेह ओळखला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयत भुजबळ याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. भुजबळवर जबरी चोरी, घरफोडी, मोबाइलचोरीसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़

Web Title:  Criminal found in the drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.