लाचखोर वरिष्ठ लिपिकास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:03 AM2018-11-29T01:03:46+5:302018-11-29T01:04:16+5:30
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढू देणार नाही. या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. अर्णव सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यास बुधवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढू देणार नाही. या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. अर्णव सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यास बुधवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरू आहे़ या चौकशीच्या कामात मदत तसेच खात्यातून काढून टाकणार नाही, असा आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात माळी याने सोमवारी (दि़२६) लाचेच्या स्वरूपात १५ हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी (दि़२७) सकाळी पोलीस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सापळा लावला होता़
पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीन शेजारील टॉयलेटमध्ये तक्रारदाराकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम घेताच वरिष्ठ लिपिक अनिल माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़