धनंजय तुंगार यांच्या हत्येबाबत गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 09:51 PM2020-10-22T21:51:29+5:302020-10-23T00:11:57+5:30
त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण होती की यामागे कोणी सूत्रधार आहे की काय ? हत्येमागचे निश्चित कारण काय याबाबतचा सखोल तपास निष्पक्ष करावा अशी मागणी आज नगरपरिषदे समोर झालेल्या शोकसभेत करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण होती की यामागे कोणी सूत्रधार आहे की काय ? हत्येमागचे निश्चित कारण काय याबाबतचा सखोल तपास निष्पक्ष करावा अशी मागणी आज नगरपरिषदे समोर झालेल्या शोकसभेत करण्यात आली. या शोकसभेला शेकडो तुंगारप्रेमी जमले होते.प्रत्येकाच्या चेह-यावर तुंगार घराण्याचे राजकारण संपविणा-या नराधमास शिक्षा झालीच पाहिजे.असा निर्धार होता.वर्षही झाले नसताना अवघ्या सात महिन्यात तुंगार घराण्याचे तीन कर्ते धर्ते पुरुष गमावले.
या शोक सभेस पुरुषोत्तम लोहगावकर उपनगराध्यक्ष संतोष कदम स्वप्निल शेलार गोविंदराव मुळे सुरेश गंगापुत्र भुषण अडसरे कैलास घुले बाळा साहेब सावंत युवराज कोठुळे राजेश घुले स्वप्निल (पप्पु) शेलार शिवसेना शहराध्यक्ष सचिन दिक्षित आर पी आयचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग डॉ.दिलीप जोशी काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर लांडे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात कैलास घुले म्हणाले आज तुंगार घराण्याचे तीन कर्तेपणा पुरुष गमावल्याने जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याची कल्पना करवत नाही. या सत्तेची चौकशी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना विनंती करावी. तर गोविंदराव मुळे म्हणाले कालचा दिवस काळा दिवस म्हणुन कायम स्मरणात राहील. या वेळी त्यांना गहिवरून आले. ते पुढे म्हणाले मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. ही तुंगार कुटुंबियांची शोकांतिका म्हणावी. तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे म्हणाले, अशी घटना पुन्हा होउ नये म्हणुन सर्वांनी खबरदारी घ्यावी. शिवसेना शहराध्यक्ष सचिन दीक्षित आपल्या भाषणात म्हणाले स्व.धनंजय तुंगार हे आक्रमक नेते होते. त्यांचे कुणाशी वैर नव्हते. काय बोलायचे ते स्पष्ट पणे तोंडावर बोलत. गुन्हेगारास कठोर शासन झाले पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम कडलग यांनी आपले मत परखड पणे मांडुन भाड्याने राहणारे भाडेकरु असे अनावश्यक लोकांची गर्दी झाली असुन भाईगिरी करतात.
तसेच 15 वयोगटा पासुन ते 18 वर्षांची अल्पवयीन पिढी यांना चाप बसवला पाहिजे.आईबापांनीच मुलांचे फालतु लाड करु नये. 18 ते 20 पर्यंतची पिढी रोलेट नशेबाजी जुगार या दुर्व्यसनाच्या आहारी जात आहेत. भाईगिरी वाढली आहे. पोलीसांनी या गोष्टी आळा घालावा.
कमी वयातील मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वहावत चालली आहे.
नगरसेवक स्वप्निल शेलार म्हणाले
त्र्यंबकेश्वर हे तिर्थक्षेत्र जगप्रसिध्द असल्याने येणारा भाविक सुरक्षित राहु शकतील का ? गावाची शांतता धोक्यात आली आहे.यावेळी मधुकर लांडे, डॉ.दिलीप जोशी पुरुषोत्तम लोहगावकर शांताराम बागुल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी सूत्रधाराच्या चौकशीची मागणी करुन पत्रकार व पोलीस प्रशासनाने पाळेमुळे शोधुन काढावीत.आता हे उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व स.पो.नि.रामचंद्र कर्पे व त्यांच्या स्टाफचे आहे. सुदैवाने कार्यतत्पर नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधिक्षक प्रतिष्ठा वालावलकर लाभल्याने त्यांनीही या प्रकरणाकडे
जातीने लक्ष घालावे. शेवटी त्र्यंबक वासियांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व सपोनि रामचंद्र कर्पे यांना गावाच्या वतीने एक निवेदन देउन गुन्हेगाराला कोर शिक्षा व्हावी. तसेच गुन्ह्याचा तपास निष्पक्ष करावा अशी विनंती करण्यात आली आहे.