‘शुभमपार्क’ बनला गुन्हेगारांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:22 AM2019-02-10T01:22:49+5:302019-02-10T01:23:05+5:30
गेल्या काही वर्र्षांपूर्वी टिप्पर गँगचा अड्डा असलेल्या शुभमपार्क भाग हा टिप्पर गॅँगच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केल्यानंतर शांत झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर पुन्हा गुन्हेगारांचे ठिंकाण म्हणून चर्चेत आला आहे. याच भागात मागील महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या दुकानावर जाऊन संशयित आरोपीने ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी (दि.८) याच शुभमपार्क भागात भरदिवसा एका तरुणाचा निर्घृण खून करण्याचा प्रकार घडला.
सिडको : गेल्या काही वर्र्षांपूर्वी टिप्पर गँगचा अड्डा असलेल्या शुभमपार्क भाग हा टिप्पर गॅँगच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केल्यानंतर शांत झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर पुन्हा गुन्हेगारांचे ठिंकाण म्हणून चर्चेत आला आहे. याच भागात मागील महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या दुकानावर जाऊन संशयित आरोपीने ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी (दि.८) याच शुभमपार्क भागात भरदिवसा एका तरुणाचा निर्घृण खून करण्याचा प्रकार घडला. या परिसरात वाढलेल्या गुन्हेगारांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे विद्यमान आमदार व शिवसेनेचे विद्यमान नगरसेवकांचे संपर्क कार्यालयदेखील शुभमपार्क भागातच असतानाही या ठिकाणी गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या महिन्यात संशयित निखील पगारे याने मामा ठाकरे यांच्या शुभमपार्क येथील दुकानातून मद्य घेतल्याने पगारे याच्याकडे दुकानातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले असता पगारे याने ठाकरे यांना फोनवर धमकी देत त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत पगारे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अद्यापही संशयित निखील पगारे याला पकडण्यात यश आलेले नाही. याच शुभम पार्कच्या परिसरात शुक्रवारी (दि.८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वैभव उर्फ बबलू गांडोळे या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दुचाकीवर आलेले शुभम पेंढारे व प्राज्वल चौधरी हे दोघे संशयित सीसीटीव्हीच्या कॅमेºयात खून करून फरार झाल्याचे दिसून येत आहे. याच शुभमपार्क भागात महिलांची सोनसाखळी चोरी करण्याचे प्रकारही घडत असून, संपूर्ण शुभमपार्क परिसरातील नागरिक सध्या दहशतीखाली आहेत.