मालेगावी सराईत गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:17 AM2020-11-25T00:17:50+5:302020-11-25T00:18:20+5:30
मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंत्रमागधारकावर खंडणीसाठी हत्याराने हल्ला करून ३० हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास रमजानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफान अंधा असे संशयिताचे नाव आहे.
मालेगाव मध्य : शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंत्रमागधारकावर खंडणीसाठी हत्याराने हल्ला करून ३० हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास रमजानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफान अंधा असे संशयिताचे नाव आहे.
दोन महिन्यांपूर्वी इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफान अंधाने यंत्रमागधारकाकडे पैशाची मागणी करीत त्यावर हल्ला करून ३० हजार रुपये लुटून फरार झाला होता. या हल्ल्यात पायाचे हाड मोडल्याने यंत्रमागधारका जखमी झाले होते. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी शहरातील पाच पंजतन चौकात इरफान उभा असल्याची माहिती रमजानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हाके, हवालदार श्रीराम बागुल, शिपाई ठाकूर आदी कर्मचारी चौकात गेले असता, पोलिसांना पाहून इरफानने पळ काढला. उपनिरीक्षक आगे यांनी पाठलाग केला. यंत्रमाग कारखान्यातून त्या कारखान्यात पळू लागला. याचदरम्यान त्याने कारखान्यातील खुर्ची, स्टुल फेकून मारत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु याची पर्वा न करता सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पथकाची प्रशंसा केली आहे.
इन्फो
यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल
संशयित इरफान अंधा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर रमजानपुरा पोलीस ठाण्यात चार, आयेशानगर पोलीस ठाण्यात दोन व शहरातील इतरही पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१९मध्ये रमजानपुरा पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली होती.