आंदोलकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:50 PM2018-03-18T23:50:03+5:302018-03-18T23:50:03+5:30
घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घोटी बाजार समितीने शेतकºयांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत भाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला होता. या शेतकºयांनी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर आपला शेतमाल फेकून देत, रस्त्यावर ठिय्या मांडीत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला होता. यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले होते. या बाबीची गंभीर दखल पोलीस यंत्रणेने घेतली असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पांडुरंग शिंदे यांच्यासह भास्कर गुंजाळ, बाळासाहेब धुमाळ आदींसह शेकडो अज्ञात शेतकºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बैठकीकडे लक्षघोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समिती आवारात भाजीपाला
विक्र ीसाठी येणाºया शेतकºयांच्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने शेतमालाचा काही माल शहराच्या बाहेर विक्र ी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेत या जागेत भाजीपाला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
या ठिकाणी सुविधा नसल्याने शेतकरी आक्र मक होत त्यांनी आंदोलन केले होते. याबाबत शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.