दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार सराईत गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 04:02 PM2019-09-13T16:02:01+5:302019-09-13T16:02:31+5:30
कळवण - तालुक्यातील नांदुरी येथील चिखलीपाडा येथे कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले आहे.
कळवण - तालुक्यातील नांदुरी येथील चिखलीपाडा येथे कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्यांकडून सुमारे ३ लाख ३५ हजार २०२ रु पये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कळवण पोलिसांच्या दमदार व धडक कामगिरीचे जनतेने स्वागत केले असून नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेऊन अभिनंदन करत सत्कार केला. दरोडा व चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका टोळी संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. रात्री पकडण्यात आलेल्या या टोळीकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, धारदार चॉपर, १ लोखंडी टॉमी, लोखंडी कटवणी, स्कु ड्रायव्हर, लोखंडी पान्हा, मोबाईल, रोख रक्कम १४ हजार ७०७ रूपये असा एकूण ३ लाख ३५ हजार २०२ रु पये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या सराईत गुन्हेगारांकडून मिळालेल्या साहित्यावरून त्याचा दरोडा घालण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट झाले असे कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले. निफाड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार श्रावण पिंपळे हा गेल्या पाच महिन्यापासून फरार होता. निफाड न्यायालयात केसची सुनावणी झाले नंतर मध्यवर्ती कारागृहात परत घेऊन जात असताना पोलिसांचे हाताला फटका देऊन कोर्टाबाहेरून पळून गेला होता. यापूर्वी सन २०१६ मध्ये अहमदनगर जिल्हातील तोफखाना पोलिस ठाणे लॉकअप मधून पळून गेला होता. या गुन्हेगारावरील जबरी लूटमार व घरफोडी व मोटर वाहन चोरी असे गुन्हे तपास उघडीस झाले आहेत. या आरोपीने ३ घरफोडी, २ जबरी चोरी, १ मोटर सायकल चोरी असे मोठे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास अजून काही गुन्हे उघडीस येण्यास शक्यता आहे. पोलिसांनी श्रावण सुरेश पिंपळे, सोहेब अन्सार मणियार, गणेश शंकर पिंपळे, किरण शिवपांडू आहिरे यांना ताब्यात घेतले असून गणेश तेलोरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.पुढील तापास नाशिक ग्रामीण अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के के पाटील कळवण पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ. रवींद्र शिलावट, दीपक अिहरे, पुंडलिक राऊत, दत्तात्रय साबळे, अमोल घुगे, प्रवीण सानप, राजू सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे, मधुकर तारू, शिवा शिंदे यांनी या कामी महत्वपूर्ण कामगिरी बजावली असून पुढील तपास करत आहे.