दीड तपानंतर हाती लागला गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:01 AM2019-02-12T01:01:41+5:302019-02-12T01:03:00+5:30

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००४ साली हाणामारीची घटना घडली होती. या गुन्ह्यात फरार असलेला संशयित तब्बल १५ वर्षांनी पोलिसांच्या हाती सोमवारी (दि.११) लागला हे विशेष! त्या संशयितास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.

Criminals kidnap after half an hour | दीड तपानंतर हाती लागला गुन्हेगार

दीड तपानंतर हाती लागला गुन्हेगार

Next
ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाणे : हाणामारीचा गुन्हा करून झाला होता फरार

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००४ साली हाणामारीची घटना घडली होती. या गुन्ह्यात फरार असलेला संशयित तब्बल १५ वर्षांनी पोलिसांच्या हाती सोमवारी (दि.११) लागला हे विशेष! त्या संशयितास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रवि रामचंद्र ऊर्फरामदास झाल्टे (रा. पंचशिलनगर, गंजमाळ) असे या संशयिताचे नाव आहे. रवि झाल्टे याच्या विरोधात २००४ साली मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले होते; मात्र संशयित रवि पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला अटक करण्यासाठी भद्रकाली पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते; मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देण्यास सफल होत होता.
तब्बल पंधरा वर्ष पाठशिवणीचा हा खेळ सुरू होता. मात्र अखेर सोमवारी भद्रकाली पोलिसांना यश आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या संशयिताच्या मुसक्या त्यांच्याच रहिवासी परिसर पंचशीलनगरातून आवळल्या. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

Web Title: Criminals kidnap after half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.