गंजलेल्या नळांना फुटला ‘पाझर’!

By admin | Published: September 9, 2015 10:14 PM2015-09-09T22:14:58+5:302015-09-09T22:27:23+5:30

मनमाड : तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आले पाणी

The crippled pipes 'leaks'! | गंजलेल्या नळांना फुटला ‘पाझर’!

गंजलेल्या नळांना फुटला ‘पाझर’!

Next

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने
मनमाड शहरात पाण्याचा ठणठणाट झाल्याने शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पालखेड धरणाचे आवर्तन मिळाल्याने तब्बल ३२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी मनमाड शहरातील आययूडीपी भागात
नळाला पाणी आल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. महिनाभरापासून नळ बंद असल्याने अनेक ठिकाणी नळ गंजल्याने पाणी आल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा गेल्या महिन्यातच संपुष्टात आल्याने हे धरण
कोरडेठाक पडले आहे. शहरातील मुरलीधरनगर भागात पाणीपुरवठा
सुरू असतानाच धरणातील पाणी संपल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
यानंतर आययूडीपी, शिवाजीनगर या भागाला पाणीपुरवठा होत असतो मात्र पाणीच संपल्याने या भागातील महिलांची पाण्याची प्रतीक्षा फोल ठरली. आज शहरातील आययूडीपी भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. या भागात तब्बल ३२ व्या दिवशी नळाला पाणी आले आहे. या पुढे शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वार्ताहर)

बंदोबस्ताअभावी आवर्तन रखडले

मनमाड शहरासाठी २७ आॅगस्टला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. सदरचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासाठी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीमुळे पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर बंदोबस्त पुरवणे शक्य नसल्याचे सांगत आवर्तन रखडले. पालखेड धरणातून शनिवारी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी वागदर्डी धरणापर्यंत पोहोचले.

Web Title: The crippled pipes 'leaks'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.