क्रूरतेचा कळस : कोटंबीतील घटना

By admin | Published: September 14, 2016 12:20 AM2016-09-14T00:20:27+5:302016-09-14T00:20:44+5:30

आजीचा खून करून मनोरुग्ण नातवाकडून शवाची शेकोटी

The Crisis of Crisis: Criminal Events | क्रूरतेचा कळस : कोटंबीतील घटना

क्रूरतेचा कळस : कोटंबीतील घटना

Next

!अझहर शेख ल्ल नाशिक
आई-वडिलांनंतर मुलांना सर्वाधिक जे प्रिय आणि जवळचे वाटतात ते आजी-आजोबा. अशाच एका आदिवासी भागातील आजीने हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून नातवाला पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळून मोठे केले. त्याच नातवाने अचानकपणे एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वर्तन करून आजीची क्रूरपणे हत्त्या केली. मनोरुग्ण नातू एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मध्यरात्रीच आजीच्या शवाची शेकोटी केल्याची हृदय हेलावणारी आणि क्रूरतेचा कळस गाठणारी घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोटंबी हे छोटेसे आदिवासी दुर्गम गाव आहे. या शिवाराच्या माळरानात एका झोपडीमध्ये भगवान भोये हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रखमीबाई राजाराम भोये (८५), पत्नी चिमीबाई भोये व मुलगा कैलास भोये (२२) यांचा समावेश आहे. कैलास हा शेतकाम व मोलमजुरी करतो आणि तो निर्व्यसनी असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात; मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून त्याचे वर्तन अचानकपणे बदलल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तो एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वागू लागल्याचे त्याच्या काही नातेवाइकांनी सांगितले. सोमवारी (दि. १२) कैलासने रात्रीच्या सुमारास झोपडीमध्ये गोंधळ घालत आजी व आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. गावामध्ये भागवत कथेचे पारायण सुरू असल्याने त्याचे वडील भगवान हे कार्यक्रमात बसलेले होते. कैलासने आजीची क्रूरपणे हत्त्या केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या आईलाही त्याने गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत चिमीबार्इंनी जीव वाचविण्यासाठी (पान ५ वर)

झोपडी सोडून पळ काढला. सक ाळी दहा वाजेच्या सुमारास भगवान भोये व अन्य नातेवाईकांनी हरसूल पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता अर्धवट स्थितीत जळालेले रखमाबाईचे प्रेत व संशयित कैलासही अर्धनग्न अवस्थेत प्रेताजवळ बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्यास अटक केली असून उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

हरसूल ग्रामीण रुग्णालयातून रुग्णाला घेऊन पोलीस व नातेवाईकांसमवेत येत असताना कैलासने रुग्णवाहिकेत गोंधळ सुरू केला. पोलिसांनी त्याला नाशिकमध्ये येईपर्यंत शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र गंगापूर गावाजवळ तो रुग्णवाहिकेत बसलेल्या त्याच्या जखमी आई व अन्य नातेवाईकांना मारू लागला. त्यामुळे नातेवाईकांच्या सांगण्यावरून आनंदवली येथे त्यांना पोलिसांनी उतरवून दिले. जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्याने पुन्हा धुमाकूळ घालत रुग्णवाहिकेच्या काचा फोडण्यास सुरुवात केली आणि बाहेर उडी टाकली. यावेळी पोलीस व अन्य नागरिकांनी झडप घालून त्यास पकडले.
- भगवान बोरसे, शासकीय रुग्णवाहिका चालक

रुग्णालयात धिंगाणामनोरुग्णाप्रमाणे कृत्य करत अर्धनग्न अवस्थेत संशयित आरोपी कैलासने रुग्णवाहिकेतून पळून जाण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालयात केला. ज्या रुग्णवाहिके तून त्याला पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले, त्या पोलिसांवरही हल्ला चढविला आणि रुग्णवाहिकेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यामुळे रुग्णालयाच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला होता. संशयित कैलास हा सुरक्षारक्षक, पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान व नागरिकांना जुमानत नव्हता. जिल्हा रुग्णालयाचा मुख्य दरवाजाही बंद करण्यात आला होता. यावेळी पाशा शेख यांनी मध्यस्थी करत धाडसाने कैलासचे हातपाय धरण्याचा प्रयत्न केला असता त्याने शेख यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. यावेळी सुरक्षारक्षक, पोलीस व नागरिकांनी त्याचे हात पाय जखडून ठेवत कापडाने बांधले आणि मनोरुग्ण कक्षात हलविले.

Web Title: The Crisis of Crisis: Criminal Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.