काटवन परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:10+5:302021-07-07T04:16:10+5:30
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी करण्यात येत आहे. ज्या परिसरात पाऊस झाला त्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तर ...
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी करण्यात येत आहे. ज्या परिसरात पाऊस झाला त्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तर काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. पेरणी केल्यानंतर आवश्यकता असतानाच पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेने आकाशाकडे लागल्या आहेत. यामध्येच लष्करी अळीची धास्ती असून, अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
प्रतिवर्षी चांगले पीकपाणी येईल या आशेवर पेरणीची कामे सुरू आहेत. अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फक्त खरीप पेरणीचा पर्याय असल्याने पावसाळ्यात या शेतकऱ्यांचा अपेक्षा उंचावत असतात. परंतु बेभरवशाचा पाऊस यंदाही भरवसा खोटा ठरवित असून, पीकपाणी येईल किंवा नाही असा कोणताही अंदाज मात्र राहिला नाही. पावसाअभावी चिंता वाढली असून, चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.