दुबार पेरणीचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:03 PM2020-07-25T15:03:29+5:302020-07-25T15:03:54+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे.
लखमापूर व परिसरात आषाढी एकादशी नंतर पाऊस गावब झाला होता. दिंडोरी तालुक्याला संपूर्ण नाशिक जिल्ह्यात द्राक्षे पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु कोरोना व कमी भाव यामुळे या द्राक्षे पंढरीला संकटमय स्वरु प प्राप्त झाले आहे. रब्बी हंगाम गेला. आता सर्व तयारी व आशा ठेवून बळीराजां खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी तयारीला लागला. परंतु खरीप हंगामाची पहिली संकटमय सुरु वात झाली ती बियाने खरेदीपासून, कारण लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे दुकाने बंद असायची. तरी पण मिळेल त्या ठिकाणाहून महागडी बियाने शेतकरी वर्गाने खरेदी केली. व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणीला सुरु वात केली. परंतु पुढे पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारली. आषाढी एकादशी नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या व पिकांना जीवदान मिळाले. आता शेतातून अंकुर काढु लागले. परंतु काही बियाणांची उगवण झाली नाही. तर काहींची उगवण झाली. त्यामुळे बळीराजांच्या समोर खराब बियाणे निघाल्याचे संकट निर्माण झाले.
परंतु काही बियाने मात्र चांगले उगवले. पिके जोमाने जमिनीतुन वर येत असतांना पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिके पाण्याअभावी करपू लागली. तेव्हा मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन वेगवेगळी पिके घेतली. आता एक दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने बळीराजांच्या समोरील दुबार पेरणी चे संकट टळले आहे.
कृत्रिम संकट..
खरीप हंगाम करीत असतांना बळीराजांवर अस्मानी व सुलतानी संकटाबरोबर आता नवीन कृत्रिम संकट आले आहे. ते म्हणजे युरिया खताचा तुटवडा. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. शासनाने आदेश काढून ही शेतकरी वर्गाला खताचा तुटवडा येणे ही चिंतेची बाब आहे. असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.