दुबार पेरणीचे संकट

By admin | Published: July 7, 2017 11:50 PM2017-07-07T23:50:14+5:302017-07-07T23:50:37+5:30

खामखेडा : आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली.

The crisis of drought sowing | दुबार पेरणीचे संकट

दुबार पेरणीचे संकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : सुरुवातीचे दोन्ही नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. परंतु पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीस आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस होत होता; परंतु खामखेडा, भऊर, पिळकोस, विठेवाडी,
वरवंडी, बगडू आदी भागात अगदी अल्प पाऊस झाला होता. यात फक्त टणक जागेवरचे पाणी वाहिले होते. मात्र आर्द्रा नक्षत्रात थोड्या फार पाऊस झाला. खरीप पिकांच्या पेरणीलायक पाऊस झाला होता. या पावसाने कोणतीही नाल्यांना पूर आला नाही. त्यामुळे भूर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. विहिरींना पाणी नसल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. लवकर पाऊस पडेल आणि विहिरींना पाणी उतरेल या आशेवर शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु या पिकांना पाणी कसे द्यावे, याची चिंता सतावत आहे.

Web Title: The crisis of drought sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.