टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 02:53 PM2020-09-08T14:53:45+5:302020-09-08T14:54:35+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.
शेतकरी वर्गाने टमाटा पिकाला पसंती दिली. थोड्या फार भांडवलाच्या आधारे टमाटा साहित्य खरेदी करून हे पिक घेण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी लोखंडी तार, बांबू, लोखंडी खिळे इ. साहित्याची खरेदी करून टमाटा पिक घेण्यासाठी मोर्चा बांधणी केली. परंतु टमाटा लागवडी पासून ते बांबू उभे करण्यापर्यंत शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली आहे.
सकाळचे वातावरण हे अतिशय दाट धुक्याचे तर दुपारी कडक ऊन व संध्याकाळी पावसाचे वातावरण अन् रात्री थंडी. त्यामुळे पिकांवर धुक्याचे पाणी साचते, परिणामी फुलकळी गळून पडणे, तसेच टमाटा फळ फुगवणीवर परिणाम होताना दिसत आहे. फुलकळी व फळांची निगा राखण्यासाठी शेतकरी वर्गाला दररोज महागडी औषधे, खते तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची फवारणी करावी लागत आहे.
चौकट...
१) वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याचे शक्यता.
२)शेतकरी टमाटा पिकं वाचिवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून पिके वाचिवण्यासाठी भर देतो आहे.
३) दाट धुक्याचा फुलकळी व फळधारणेवर परिणाम होण्याची शक्यता.
४) अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल.
५) मागील वर्षी पेक्षा यंदा भांडवल जास्त खर्च झाल्याने बळीराजा हतबल.
प्रतिक्रि या..
यंदा टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ होत आहे. कोरोनामुळे अगोदर नर्सरी मध्ये टोमॅटो रोपे मिळत नव्हती. परंतु मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून या पिकांला पसंती दिली. परंतु वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च झालेला आहे. त्यामुळे आम्हाला टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ करावी लागत आहे.
- समाधान देशमुख, शेतकरी, कोशिंबे.