संपातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:51 AM2018-06-18T00:51:43+5:302018-06-18T00:51:43+5:30
वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे.
नाशिक : वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिवहन महामंडळातील वेतनाचा मुद्दा गाजत असून, वेतनाच्या प्रश्नावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतन करार जाहीर केल्यानंतर ८ आणि ९ रोजी राज्यात एस.टी. कर्मचाºयांनी अघोषित संप पुकारला होता. मात्र या संपाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. संप नेमका कोणत्या संघटनेने पुकारला याविषयी कुणी पुढेही आले नाही. या संपामुळे दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, तर प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारण्यात आलेल्या संपामुळे प्रशासन आणि प्रवाशांचीही चांगलीच धावपळ झाली. वेतन करारामुळे कर्मचाºयांना अपेक्षित आर्थिक लाभ होणार नसल्याचा आरोप करीत यामुळे कर्मचाºयांच्या पदरी निराशा पडल्याचे पडसाद उमटून संपाचा प्रकार घडला होता. मात्र कराराला विरोध करणाºयांपैकी कोणत्याही संघटनेने संपाची जबाबदारी स्वीकारली नसल्याने संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. राज्यभरात अनेक कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. आता परिवहन महामंडळाने आपला मोर्चा बदली मागणाºया कर्मचा-यांकडे वळविला असून, जे संपात सहभागी होते अशा कर्मचा-यांच्या बदलीला यामुळे खो बसणार असल्याचे एकूणच चित्र निर्माण झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापकांनी याप्रकरणी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून विनंती बदली मागणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली आहे. अघोषित संपाच्या कालावधीत संपात सहभागी असलेल्या कर्मचाºयांपैैकी पदनिहाय कोणकोणत्या कर्मचाºयांनी बदली मागितली आहे याची माहिती राज्यभरातून गोळा केली जात
आहे. संपासारखा विषय अतिशय गंभीर असून, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग नियंत्रकांनी सोमवारपर्यंत कर्मचाºयांची नावे कळवावित, असे पत्र विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे.