बळीराजांवर विविध बँकांची वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 06:34 PM2020-11-22T18:34:33+5:302020-11-22T18:35:06+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरी बँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरीबँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस त्यांत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नसल्यांमुळे बळीराज्य अनेक संकटानां तोंड देत असताना बँक प्रशासानाकडून शेतक-यांच्या जमिनीचे लिलाव जर होणार असतील तर शासनाने आधी शेतक-यांच्या पिकांचे कृषीविषय धोरण जाहिर करावे. आज शेतक-यांची जी अवस्था झाली आहे. ती फक्त त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांत अनेक नैसगिक आपत्तीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.
तालुक्यात अनेक शेतक-यांनी बँका कडून कर्ज काढून फळबागासह पॉलिहाऊसमध्ये भाजीपाल्यासह फळाची लागवड केली मात्र अनेक वेळा उपन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे व फळबागासह भाजीपाला पिका योग्य भाव न मिळांल्यामुळे दिवसोदिवस जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होत आहे.
विशेष म्हणजे या पिकांत पैसे नाही झाले तर पुढील पिकांत पैसे होतील या आशेवर शेतकरी भांडवल उभे करून पिकांची लागवड व पेरणी करत असतो मात्र वांरवार पिकापासून नैसर्गिक आपत्ती किंवा बाजार भाव न मिळाल्यांमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या एका नव्या वळाणावर येवून उभा आहे त्यांमुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर आशी झाली आहे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी झाले ते द्राक्ष शेतीमध्ये कारण सध्या द्राक्षशेती अतिशय धोक्याच्या वळणावर येवून उभी आहे. द्राक्षपिकांला मोठ्या प्रमाणावर भांडवल लागत असते व भांडवल खर्च करूनही योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
प्रतिक्रिया
राज्यात गेल्या दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी दोन लाखापर्यंत दिली तरी या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना पुरेपूर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असून बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
- रोहिणी गावित, जि प सदस्य अहिवंतवाडी गट.