एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 09:47 PM2020-08-31T21:47:45+5:302020-09-01T01:12:52+5:30
एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आभाळात सदैव पावसाचे काळे ढग दिसतात. मधूनमधून पावसाच्या सरी येत असतात. क्वचितच सुर्य दर्शन होते. संततधारेमुळे सगळीकडे दलदल निर्माण झाली आहे. पिकांच्या पोषणासाठी उन्हाची गरज असते पण ऊन पडतच नाही. मूग, बाजरी ही पिके अनेक दिवसांपासून काढणीस आली आहेत. सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामूळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्तम प्रतीचा मूग बाजारात सात हजार रु पये क्विंटल च्या दरम्यान विकला जातो तर काळसर मुगास फक्त हजार पंधराशाचा भाव मिळतो.
भाजीपालाही सडून जात आहे. सोंगणीस आलेली बाजरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. सोयाबीन पिवळे पडले आहे. चाळीतील कांदे सडू लागले आहे. शेतीची मशागत करणे, पिकांंची निगा राखणे, औषधे, खते टाकने हे शेतकर्यांच्या हाती आहे पण नैसिर्गक हानी व बाजारभावतील घसरण शेतकर्?यांच्या हाती नसल्याने भांडवल खर्च करून व रात्रंदिवस कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. एक संकट पार केले की दुसरे संकट वाट आडवते त्यामूळे दिवसेंदिवस शेतकर्यांचे शारिरीक, मानिसक व आर्थीक बळ खचत चालले आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दत्तु वावधने, लहानू बारहाते, विट्ठल जगताप, शिवाजी खापरे, काकासाहेब पडोळ, देवीदास उराडे आदींनी केली आहे.