मालेगाव तालुक्यात पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:48 PM2020-07-28T21:48:58+5:302020-07-29T00:48:58+5:30
मालेगाव शिवरोड : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पूर आला. या पूरपाण्यात जनावरे आणि कांद्याच्या चाळी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

साकुरी गावात अतिवृष्टी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. गावाजवळील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नाल्याजवळील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्यावर्षीदेखील अतिवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पावसाने पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आता आलेल्या पुरात बºयाच शेतकºयांची जनावरे, कांदा वाहून गेल्याने झालेल्या नुकसानाची तहसीलदारांनी पाहणी करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.