वडेल कृषी विज्ञान केंद्राकडून पीक पाहणी

By admin | Published: October 17, 2014 11:00 PM2014-10-17T23:00:55+5:302014-10-17T23:01:09+5:30

वडेल कृषी विज्ञान केंद्राकडून पीक पाहणी

Crop inspection by Vadel Agricultural Science Center | वडेल कृषी विज्ञान केंद्राकडून पीक पाहणी

वडेल कृषी विज्ञान केंद्राकडून पीक पाहणी

Next

मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे परिसरातील शेतपिकांचा पाहणी दौरा करण्यात आला. त्यात खरीप कांदा पिकावर फूलकीडे व मावा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ढगाळ हवामान तसेच दिवस रात्रीच्या तपमानातील फरकामुळे किडी व करपा रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी १० ते १५ दिवसांच्या अंतराने चार फवारण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले.
बागलाणमधील पिकांची पाहणी
मालेगाव : कॅम्पातील कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बागलाण तालुक्यातील बिजोटे, दऱ्हाणे, भुयाणे, पिंगळवाडे, चौगाव व तांदूळवाडी येथील डाळींब व द्राक्षपिकांची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना सदर पिके व खते याविषयीची तांत्रिक व वैज्ञानिक माहिती दिली. तर शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य डी. आर. सागर, कृषी पर्यवेक्षक एच. के. जाधव व श्रीमती एस. आर. गवळी यांच्यासह सर्व विद्यार्थी व संबंधित शेतकरी आदि उपस्थित होते.

Web Title: Crop inspection by Vadel Agricultural Science Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.