निफाड तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:34 PM2020-07-26T17:34:33+5:302020-07-26T17:35:17+5:30
चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.
चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या पिकानुसार प्रति हेक्टरी प्रीमियम भरून शेतकºयांना पीक विमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून वातावरणातील बदलाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पावसाची अनियमितता, पावसाचा खंड, कीड रोगांचा प्रादुर्भाव, पीक कापणी दरम्यान पावसाचा फटका तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असून शेतकºयांना मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे शेतकºयांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचा परतावा दिला जातो. नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये तालुक्यातील पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. मागील वर्षी एकूण सहा हजार तीनशे शेतकर्यांना सहा कोटी सत्तावन्न लाख रु पयांची भरपाई मिळाली आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकानी पीक विमा काढल्यास त्याचा फायदा अधिक होणार आहे. निफाड तालुक्यातील जवळपास तीन हजार सातशे एकावन्न शेतकर्यांनी विमा उतरविला आहे.
शेतकर्यांना पीक विमा काढल्यास पिकांना सुरक्षाकवच मिळते. त्यामुळे तालुक्यातील तसेच जिल्यातील जास्तीतजास्त शेतकर्यांनी 31 जुलैपर्यंत पीक विमा काढून पिकाचे संरक्षण करण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या वतीने जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.