पीकविमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:38 PM2021-06-08T22:38:28+5:302021-06-09T01:06:28+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले.
घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले.
मात्र पीकविमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही त्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना संबंधित अधिकारी स्तरावर पीकविमा कंपनीकडून त्वरित भरपाई मिळावी याकरिता तालुक्यातून सर्वपक्षियांच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारूंगसे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, तानाजी आव्हाड, विष्णू राव, पांडुरंग कोकणे, दीपक गायकवाड, सोमनाथ आव्हाड, विष्णू पोरजे, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहर अध्यक्ष वसीम सैयद, गोटीराम शेलार, दत्तू कापसे, तुकाराम वारघडे, बाळासाहेब धुमाळ, योगेश शेलार, भास्कर पोरजे, माजी प. स . सभापती विष्णू चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.